प्रतिक्षा संपली... उद्या बारावीचा निकाल !

Foto

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे उलट-सुलट चर्चेला ब्रेक लागणार आहे. 

बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून उद्या दि. १६ परीक्षा मंडळाच्या वतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना महामारी मुळे यावर्षी निकाल लावण्यासाठी अनेक अडचणींना परीक्षा मंडळाला सामोरे जावे लागत होते. परंतु उद्या (दि.१६) १ वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे. विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेला विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे एकूण विभागातून १ लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. त्यात १लाख ६ हजार १४१ मुले तर ६५ हजार ८१८ मुलींचा समावेश होता. विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ हजार ७१२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर जालना जिल्ह्यातील ३० हजार ८१४ विद्यार्थी तर परभणी जिल्ह्यातील २४ हजार ४५४, हिंगोली जिल्ह्यातील १३ हजार २४८ आणि बीड जिल्ह्यातील ४० हजार ६५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. 

*या संकेतस्थळावर पहाता येणार निकाल*
* www.mahresult.nic.in
*www.hscresult.mkcl.org
* www.maharashtraeducation.com

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker